संग्रामपूर ः विलगीकरण कक्षातील सुविधांची पं. स. सभापतींनी केली पाहणी
संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः राज्य शासनाने ग्रामपंचायतींना विलगिकरण कक्षाच्या उभारणीचे आदेश दिल्याने गावागावात विलगिकरण कक्ष उभारणीचे काम सुरू आहे. काही ठिकाणी विलगिकरण कक्षांत सर्व सुविधा दिल्या जात आहेत. संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी, मारोड, निवाना येथील विलगिकरण कक्षाला संग्रामपूर पंचायत समिती सभापती रत्नप्रभा निळकंठ धर्माळ यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. विलगिकरण कक्षाच्या व्यवस्थापकांशी रुग्ण व इतर सोयीसुविधांबाबत चर्चा केली. पॉझिटिव्ह रुग्णांना विलगिकरण कक्षात ठेवण्यासाठी स्थानिक समितीची मदत घ्या, अशी सूचना केली. या वेळी पळशी झाशीचे सरपंच अभयसिंह मारोडे, सरपंच सविता दांडगे, अनंत मानकर, अविनाश धर्माळ, संजय बोरसे, विस्तार अधिकारी भिलावेकर, तलाठी जाधव, ग्रामसेवक विजय कोथळकर, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर उपस्थित होते.