संग्रामपूर ः दत्ता पाटील यांच्यावरील हल्ल्यामागे संभाजी ब्रिगेडला वेगळाच संशय!

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान काही विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या चिथावणीवरून गावातील गावगुंडांनी जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्तात्रय यशवंतराव पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामागे काही राजकीय पक्षांच्या नेत्यांचा हस्तक्षेप असल्याची चर्चा असून या गंभीर विषयात उच्चस्तरीय सीबीआय चौकशी करून दोषींना कठोर …
 

संग्रामपूर (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान काही विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या चिथावणीवरून गावातील गावगुंडांनी जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्तात्रय यशवंतराव पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामागे काही राजकीय पक्षांच्या नेत्यांचा हस्तक्षेप असल्याची चर्चा  असून या गंभीर विषयात उच्चस्तरीय सीबीआय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी अन्यथा संग्रामपूर तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संग्रामपूर तहसीलदारांना निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष आशिष बकाल, शिवसेना वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद अस्वार, शिवसेना शाखा उप प्रमुख भगवान पवार, संभाजी ब्रिगेडचे नितीन बकाल, विशाल बकाल, अक्षय महाले, गोपाल ठाकरे, मनोज बकाल, चेतन देशमुख आदी उपस्थित होते.