शेगाव ः गजाननदादा ढगे यांच्‍या वाढदिवसानिमित्त अन्नदान

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मराठा पाटील युवक समितीचे संस्थापक अध्यक्ष गजानन दादा ढगे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासत गरजूंना अन्नदान करून साजरा करण्यात आला. सईबाई मोटे रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाइक तसेच कोविड सेंटरमधील रुग्णांना जेवण वाटप करण्यात आले. कार्यक्रमास बोंडगावचे सरपंच रामा थारकर, जवळाचे सरपंचपती धनराज खोंड, पाडसूळचे सरपंचपती योगेश …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मराठा पाटील युवक समितीचे संस्थापक अध्यक्ष गजानन दादा ढगे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासत गरजूंना अन्नदान करून साजरा करण्यात आला.

सईबाई मोटे रुग्णालयातील रुग्‍ण आणि त्यांचे नातेवाइक तसेच कोविड सेंटरमधील रुग्णांना जेवण वाटप करण्यात आले. कार्यक्रमास बोंडगावचे सरपंच रामा थारकर, जवळाचे सरपंचपती धनराज खोंड, पाडसूळचे सरपंचपती योगेश पिसे, जिल्हा संघटक अविनाश कुटे, जिल्हा सदस्य विठ्ठल अवताडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष भूषण दाभाडे, तालुकाध्यक्ष मोहन घुईकर, शेगाव तालुका अध्यक्ष रवी पाटील ढोले, तालुका कार्याध्यक्ष सतीश पाटील लांजूळकर, सदस्य आकाश थारकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेगाव शहराध्यक्ष श्याम पाटील अढाव, कार्याध्यक्ष विठ्ठल लांजूळकर, उपाध्यक्ष अविनाश शेजोळे, सचिव दत्ता खोंड, विद्यार्थी समिती उपाध्यक्ष गौरव लांजूळकर, गणेश गोळे, अमोल हिंगणे, धनंजय शेजोळे, अश्विन खोंड, सौरव थारकर आदींनी पुढाकार घेतला.