शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती अत्यावस्थ
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगावच्या श्री संत गजानन महाराज मंदिर संस्थानचे सर्वेसर्वा निष्काम कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती अत्यावस्थ आहे. त्यांच्यावर घरीच वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
मल्टीऑर्गन फेलीवरची लक्षणे त्यांच्यात दिसून आली होती. त्यानंतर तीन दिवसांपासून डॉ. हरीश सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथक त्यांच्यावर उपचार करत आहेत. घरातच मेडिकल सेटअप उभारण्यात आला असून, ऑक्सीजन लावलेला असून, रक्तदाब कमी झालेला असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. आयुर्वेद उपचाराला कायम भाऊंनी प्राधान्य दिलेले असल्याने बुलडाणा येथील आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. गजानन पडघान यांनाही तिथे बोलविण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
काय आहे मल्टीऑर्गन फेलीवर…
ज्यांच्या शरीराची एकापेक्षा अधिक अंग काम करणे बंद करतात त्यांना मल्टीऑर्गन फेलीवरचा धोका वाढतो. रोगप्रतिकारकशक्तीसह संपूर्ण शरीर यामुळे प्रभावित होते.
(भाऊंच्या प्रकृतीबद्दल सकाळी अफवा पसरवल्या गेल्या. मात्र वाचकांनी बुलडाणा लाइव्हवर जोपर्यंत बातमी प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. बुलडाणा लाइव्हवर प्रसिद्ध होणारी प्रत्येक बातमी ही खात्री आणि सत्यतेच्या निकषावर तपासूनच प्रसिद्ध होत असते. बिग ब्रेकिंगच्या नावाखाली कधीही बुलडाणा लाइव्ह असत्य माहिती प्रसारित करत नाही.)