वीज तार तुटून अंगावर पडली, शेतमजुराचा जागीच मृत्‍यू; मलकापूर तालुक्‍यातील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महावितरणची विद्युत तार तुटून शेतमजुराच्या अंगावर पडल्याने यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना हरणखेड (ता. मलकापूर) शिवारात काल, 6 जूनला दुपारी 3 च्या सुमारास घडली. रमेश श्रावण तायडे (50, रा. हरणखेड) असे मृत्यू झालेल्या शेतमजुराचे नाव असून, ते मोतीलाल सोनटक्के यांच्या शेतात सरी काढण्याचे काम करत होते. दुपारी 3 …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः महावितरणची विद्युत तार तुटून शेतमजुराच्‍या अंगावर पडल्याने यात त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला. ही घटना हरणखेड (ता. मलकापूर) शिवारात काल, 6 जूनला दुपारी 3 च्‍या सुमारास घडली.

रमेश श्रावण तायडे (50, रा. हरणखेड) असे मृत्‍यू झालेल्या शेतमजुराचे नाव असून, ते मोतीलाल सोनटक्‍के यांच्‍या शेतात सरी काढण्याचे काम करत होते. दुपारी 3 च्‍या सुमारास अचानक त्‍यांच्‍यावर तार तुटून पडली. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ, काँग्रेस तालुकाध्यक्ष बंडू चौधरी, राजू नेवे, जीवनसिंह राजपूत यांनी घटनास्‍थळी धाव घेतली. महावितरणचे अधिकारी आणि पोलीसही आले. शेतमजुराच्‍या कुटुंबाला महावितरणकडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी ॲड. रावळ यांनी केली आहे.