रुग्ण दगावल्याने खामगावच्या लाईफलाईन हॉस्पिटलसमोर राडा; हॉस्पिटल सील असूनही डॉक्टरांची ती शक्कल आली अंगलट!

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने खामगावचे लाईफ लाईन हॉस्पिटल सील असतानाही डॉक्टरांनी रुग्णाला शेजारच्या हॉस्पिटलमध्ये भरती केले. रुग्णावर उपचार केले. रुग्णाची प्रकृती खालावत असल्याचे दिसताच रुग्णाला दुसर्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. दुसर्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाला नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाला मृत घोषित केले. त्यामुळे संतापलेल्या नातेवाइकांनी मृतदेह पुन्हा लाईफ लाईन हॉस्पिटलसमोर आणला. डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल …
 

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने खामगावचे लाईफ लाईन हॉस्पिटल सील असतानाही डॉक्टरांनी रुग्णाला शेजारच्या हॉस्पिटलमध्ये भरती केले. रुग्णावर उपचार केले. रुग्णाची प्रकृती खालावत असल्याचे दिसताच रुग्णाला दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये रुग्णाला नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाला मृत घोषित केले. त्यामुळे संतापलेल्या नातेवाइकांनी मृतदेह पुन्हा लाईफ लाईन हॉस्पिटलसमोर आणला. डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला. शेवटी रात्री उशिरा ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी नातेवाइकांची समजूत काढली आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगावच्या सामान्य रुग्णालयात नेण्यात आला.

खामगाव येथील डॉ. आशिष अग्रवाल यांचे लाईफ लाईन हॉस्पिटल काही दिवसांपासून वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. विनापरवानगी कोविड सेंटर चालविणे, एकेका रुग्णाला 14 रेमडीसीवर इंजेक्शन देणे अशा प्रकारांमुळे दोषी ठरवून जिल्हाधिकार्‍यांनी लाईफ लाईन हॉस्पिटल सील करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही डॉक्टरांनी रुग्ण तपासण्याचे काम सुरूच ठेवले.आलेले रुग्ण शेजारच्याच इंगळे हॉस्पिटलमध्ये भरती करून त्यावर डॉक्टर उपचार करत असल्याचा आरोप आहे.

काल खामगाव शहराजवळील किसननगर येथील रुग्ण लक्ष्मण काटे (50) यांना खोकल्याचा त्रास असल्याने डॉ. अग्रवाल यांनी या रुग्णाला शेजारील इंगळे हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. सायंकाळी चारच्या सुमारास रुग्णाची तब्येत अचानक बिघडली. डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाइकांना बोलावून दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. तात्काळ दुसर्‍या रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी एक तासापूर्वीच तुमच्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. डॉ. अग्रवाल यांनी रुग्णाचा मृत्यू झालेला असतानाही माहिती दिली नाही, असा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला. रुग्णवाहिकेतून मृतदेह पुन्हा लाईफलाईन हॉस्पिटलसमोर नेण्यात आला. जोपर्यंत डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह उचणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली होती. रात्री 10 च्या सुमारास ठाणेदार सुनील अंबुलकार व तहसीलदारांनी घटनास्थळी जाऊन नातेवाइकांची समजूत काढली. कायदा समजावून सांगितला. रुग्णाचे पोस्टमार्टम करतेवेळी दोन पोलीस कर्मचारी हजर राहतील, असे सांगितले.त्यानंतर रुग्णाच्या नातेवाइकांनी आंदोलन मागे घेतले. आज सकाळी खामगाव सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.