रात्री साडेअकराला २५ वर्षीय तरुणी घरातून निघून गेली; शेगाव तालुक्‍यातील घटना

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिंचोली (ता. शेगाव) येथील २५ वर्षीय तरुणी घरातून कुणाला काही न सांगता निघून गेली आहे. तिचा शोध तिच्या वडिलांनी सगळीकडे घेतला. पण ती मिळून आली नाही. अखेर शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार देण्यात आली आहे. वासुदेव नारायण ढगे (६२, रा. चिंचोली) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. तक्रारीत म्हटले आहे, …
 
रात्री साडेअकराला २५ वर्षीय तरुणी घरातून निघून गेली; शेगाव तालुक्‍यातील घटना

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिंचोली (ता. शेगाव) येथील २५ वर्षीय तरुणी घरातून कुणाला काही न सांगता निघून गेली आहे. तिचा शोध तिच्‍या वडिलांनी सगळीकडे घेतला. पण ती मिळून आली नाही. अखेर शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार देण्यात आली आहे.

वासुदेव नारायण ढगे (६२, रा. चिंचोली) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. तक्रारीत म्‍हटले आहे, की भारती १२ ऑक्‍टोबरला रात्री साडेअकराच्‍या सुमारास घरातून कोणाला काहीही न सांगता कुठेतरी निघून गेली. त्यावेळी तिने पांढरी सलवार, प्रिंटेड लाल कुडता परिधान केलेला होता. तिचा रात्रीच शेगाव रेल्वे स्टेशन, गजानन महाराज मंदिर परिसर, खामगाव बसस्थानक येथे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. तपास पोहेकाँ ज्ञानदेव ठाकरे करत आहेत.