म्‍हणून शिवसेना म्‍हणतेय, ईगल सिड्सचे सोयाबीन बियाणे विकू नका!; नांदुऱ्यात आक्रमक

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ईगल सिड्स बायोटेक कंपनीचे सोयाबीन बियाणे कृषी केंद्रचालकांनी विकू नये. विकले आणि सोयाबीन निघाले नाही तर त्याची पूर्ण जबाबदारी घ्यावी, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. याबाबत नांदुरा तालुका शिवसेनेने तहसील कार्यालयास निवेदन दिले. नायब तहसीलदार संजय मार्कंड यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे, की खरीप हंगाम 2020 …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ईगल सिड्स बायोटेक कंपनीचे सोयाबीन बियाणे कृषी केंद्रचालकांनी विकू नये. विकले आणि सोयाबीन निघाले नाही तर त्याची पूर्ण जबाबदारी घ्यावी,  असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

याबाबत नांदुरा तालुका शिवसेनेने तहसील कार्यालयास निवेदन दिले. नायब तहसीलदार संजय मार्कंड यांनी निवेदन स्‍वीकारले. निवेदनात म्‍हटले आहे, की खरीप हंगाम 2020 मध्ये ईगल सिड्स बायोटेक लिमिटेड इंदोर या कंपनीचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांनी दुकानदारांकडून घेऊन पेरलं होते. 2020 मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी या कंपनीचे सोयाबीन पेरलं होतं ते उगवलंच नव्हतं. नांदुरा तालुक्यातील 132 शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. पैकी फक्त 13 शेतकऱ्यांना मदत मिळाली. बाकीचे शेतकरी अजूनही मदतीच्‍या प्रतीक्षेत आहेत. त्‍यांना ना कृषी केंद्रांनी कुठली मदत केली नाही त्या इंदौरच्या कंपनीने, असे निवेदनात म्‍हटले आहे. निवेदनावर तालुकाप्रमुख संतोष डिवरे, राजू काटे, सुनील जुनारे, रवी इटखेडे, गजानन करंगळे, संजयसिह जाधव, राम पांडव, गणेश ताठे, दत्ता जुमडे, नंदू खोदले, दीपक जुमडे, जगदीश चोपडे, विशाल फाळके, संतोष लाहुडकर, संतोष दिघे, मनोज पाटील, एकनाथ वक्ते,ईश्वर पांडव,बाळकृष्ण गायगोळ,पद्यमाकर लांडे,महादेव काळे,भिका गायकवाड, विष्णु घानोकर, विशाल हेलगे, विष्णू क्षीरसागर, मिलिंद हिवराळे, पुरुषोत्तम महाले आदी उपस्थित होते.