पूरग्रस्त ड्रायव्हिंग स्‍कूलमालकांना मदत!; “ही’ संघटना ठरली देवदूत

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पश्चिम महाराष्ट्रात महापुरात नुकसान झालेल्या ड्रायव्हिंग स्कूलमालकांना महाराष्ट्र राज्य ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेने नुकतीच आर्थिक मदत देऊन आधार दिला आहे. चिपळूण, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर व कल्याण भागात जुलैमध्ये पावसाने कहर केल्याने आलेल्या पुरात ड्रायव्हिंग स्कूल मालकांचे अतोनात नुकसान झाले. पूरग्रस्त ड्रायव्हिंग स्कूल मालकांना मदत म्हणून महाराष्ट्र राज्य …
 
पूरग्रस्त ड्रायव्हिंग स्‍कूलमालकांना मदत!; “ही’ संघटना ठरली देवदूत

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पश्चिम महाराष्ट्रात महापुरात नुकसान झालेल्या ड्रायव्हिंग स्कूलमालकांना महाराष्ट्र राज्‍य ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेने नुकतीच आर्थिक मदत देऊन आधार दिला आहे.

चिपळूण, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर व कल्याण भागात जुलैमध्ये पावसाने कहर केल्याने आलेल्या पुरात ड्रायव्हिंग स्‍कूल मालकांचे अतोनात नुकसान झाले. पूरग्रस्त ड्रायव्हिंग स्‍कूल मालकांना मदत म्हणून महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्‍कूलमालक संघटनेतर्फे १० हजार रुपये प्रत्येकी देण्यात आले. सर्वात जास्त नुकसान झालेल्या श्रुतिका ड्रायव्हिंग स्‍कूल, चिपळूण यांना संघटनेतर्फे मारूती स्विफ्ट कार देण्यात आली.

या वेळी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघुले, कार्याध्यक्ष संतोषकुमार जैस्वाल यांनी संघटनेच्या पूरग्रस्त मदतनिधीला मदत करणाऱ्या सभासदांचे आभार मानले. पूरग्रस्त निधीस सढळ हस्ते मदत करणारे महेश शिलीमकर व विजयकुमार दुग्गल यांचा सत्कार संघटनेचे खजिनदार देवराम बांडे यांनी केला, अशी माहिती श्रीगुरूदेव मोटार ड्रायव्हिंग स्‍कूल शेगावचे संचालक तथा महाराष्ट्र राज्य ड्रायव्हिंग स्‍कूल मालक संघटनेचे संघटक ज्ञानेश्वर कुकडे, संघटनेचे महासचिव सोपान ढोले यांनी दिली.