पीडित सोळंके कुटुंबाला आर्थिक मदत करा; आमदार डॉ. कुटे यांची शासनाकडे मागणी

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद तालुक्यातील मोहिदेपूर येथील तेजराव सोळंके यांची १९ जून रोजी रायगड जिल्ह्यातील उरण येथे निर्घृण हत्या करण्यात आली होती. तेजराव शालिग्राम सोळंके (३५) हे उरण येथे बहुरूपी व त्याची विविध रूपे धारण करून भिक्षा मागत उदरनिर्वाह करत होते. १९ जूनला त्यांचा मृतदेह आढळला. घातपाताचा संशय व्यक्त करून त्यांच्या …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद तालुक्यातील मोहिदेपूर येथील तेजराव सोळंके यांची १९ जून रोजी रायगड जिल्ह्यातील उरण येथे निर्घृण हत्या करण्यात आली होती. तेजराव शालिग्राम सोळंके (३५) हे उरण येथे बहुरूपी व त्याची विविध रूपे धारण करून भिक्षा मागत उदरनिर्वाह करत होते. १९ जूनला त्‍यांचा मृतदेह आढळला. घातपाताचा संशय व्‍यक्‍त करून त्‍यांच्‍या कुटुंबियांनी चौकशी करून न्याय देण्याची मागणी केली होती. आमदार डॉ. संजय कुटे यांनी सोळंके कुटुंबीयांना सांत्वनपर भेट देत कार्यकर्त्यांमार्फत तातडीची ५० हजार रुपये इतकी रक्कम तातडीची आर्थिक मदत म्हणून दिली होती. काल, ७ जुलैला पीडित सोळंके कुटुंबीयांसमवेत आमदार डॉ. कुटे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेत त्यांना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. कुटुंबीयांना चौकशी करून न्याय देण्यात यावा तसेच चार लक्ष रुपये इतकी आर्थिक मदत देण्याची मागणी केली. यावेळी मृतकाची आई रेशमाबाई सोळंके, जिल्हा परिषद सदस्य बंडू पाटील, बाजार समिती संचालक गजानन सरोदे, गजानन मुळे, रवी चव्हाण, कृष्णा बाबर, संतोष शिंदे, काशिनाथ शिंदे, मंगल सोळुंके उपस्थित होते.