पातुर्डाच्‍या सेंट्रल बँकेला आग!

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील पातुर्डा सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत मध्यरात्री १२ ला (२० ऑक्टोबर) शाॅर्ट सर्किटमुळे आग लागली. यात संगणक संच जळून खाक झाला. कोजागिरी पौर्णिमेमुळे जागे असलेल्या नागरिकांना आग लागल्याचे दिसल्याने मोठा अनर्थ टळला. आगीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यात आले. शिपाई देवकर, अजय व्यास, रमणलाल सेवक, कुशल दवे, योगेश तायडे आदींनी रात्री …
 
पातुर्डाच्‍या सेंट्रल बँकेला आग!

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील पातुर्डा सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत मध्यरात्री १२ ला (२० ऑक्‍टोबर) शाॅर्ट सर्किटमुळे आग लागली. यात संगणक संच जळून खाक झाला. कोजागिरी पौर्णिमेमुळे जागे असलेल्या नागरिकांना आग लागल्याचे दिसल्याने मोठा अनर्थ टळला. आगीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यात आले. शिपाई देवकर, अजय व्यास, रमणलाल सेवक, कुशल दवे, योगेश तायडे आदींनी रात्री शाखा उघडून आग विझवली. आगीत बँकेचा एक संगणक संच व कागदपत्रे जळाली. पंचनामा न झाल्यामुळे नुकसानाची आकडेवारी समजू शकली नाही. दरम्यान बुधवारी बँकेचे कामकाज बंद होते.