निर्बंध शिथिल करा; नांदुऱ्यातील व्‍यापाऱ्यांचे तहसीलदारांसह आमदारांना साकडे

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लॉकडाऊन आदेशात अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. त्याप्रमाणे इतरही व्यावसायिकांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात द्यावी, अशी मागणी नांदुरा येथील व्यापाऱ्यांनी केली आहे. याबाबत नांदुरा तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी आणि आमदार राजेश एकडे यांना निवेदन देण्यात आले. आदेश शिथिल करण्यासाठी आपण प्रयत्न करावे, असे साकडे व्यापाऱ्यांनी घातले. यावेळी खेमचंद …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लॉकडाऊन आदेशात अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. त्याप्रमाणे इतरही व्यावसायिकांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात द्यावी, अशी मागणी नांदुरा येथील व्यापाऱ्यांनी केली आहे. याबाबत नांदुरा तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी आणि आमदार राजेश एकडे यांना निवेदन देण्यात आले. आदेश शिथिल करण्यासाठी आपण प्रयत्‍न करावे, असे साकडे व्‍यापाऱ्यांनी घातले.  यावेळी खेमचंद चंदभनानी, दिनेश हरगुणानी, श्री. बरालिया, शैलेश चिंचोळकर, संदीप तळोले, गुड्डू रामचंदानी, सतीश आडोळकर यांच्यासह न.प. उपाध्यक्ष लाला इंगळे, नगरसेवक प्रमोद गायकवाड, अजय भिडे, छोटूभाऊ कोलते, अजय घानोकार, बाळू डांगे, डॉ. अमीन आदी उपस्थित होते.