ना घंटा, ना गाडी!; शेगावमध्ये नागरिकांची ओरड अन्‌ अनेकांचा कचरा रस्‍त्‍यावर!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव नगरपालिका प्रशासनाने कचरा जमा करण्यासाठी घंटागाड्यांचे नियोजन केले आहे. नियमित घंटागाड्या येत नसल्याची ओरड होत आहे. शिवाजीनगर, ओमनगर, हायफाय कॉलनी परिसरात दैनंदिन वापराचा कचरा घरातच पडून राहत असल्याने दुर्गंधी होत आहे, तर अनेक जण रस्त्यावरच कचरा फेकून देतात. कामगारांना विचारणा केली असता त्यांच्याकडूनही उडावाउडवीची उत्तरे दिली …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः शेगाव नगरपालिका प्रशासनाने कचरा जमा करण्यासाठी घंटागाड्यांचे नियोजन केले आहे. नियमित घंटागाड्या येत नसल्याची ओरड होत आहे. शिवाजीनगर, ओमनगर, हायफाय कॉलनी परिसरात दैनंदिन वापराचा कचरा घरातच पडून राहत असल्याने दुर्गंधी होत आहे, तर अनेक जण रस्‍त्‍यावरच कचरा फेकून देतात. कामगारांना विचारणा केली असता त्यांच्याकडूनही उडावाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे नागरिक सांगतात.

शेगाव नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी असून, परिषदेला नामांकन मिळालेले आहे. तरीसुध्दा प्रशासनाचा कानाडोळा प्रभागात घाणीचे सम्राज्य वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. संबंधित कंत्राटदाराची मनमानी सुरू असून दोन-दोन दिवस घंटा गाडी फिरकत नाही. त्यामुळे दोन दिवसांचा कचरा  घरात जमा करून ठेवावा लागतो, असे महिलांनी सांगितले. नगर परिषद प्रशासनाने त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.