नांदुऱ्यात महावितरणविरोधात शिवसेना आक्रमक!; तोडफोडीची धमकी!

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याबद्दल शिवसेनेने महावितरणविरोधात आंदोलन छेडले आहे. काल, 25 मार्चला सकाळी 11 वाजता महावितरण कंपनीला तोडफोडीचा इशारा देणारे निवेदन देण्यात आले.शेतातील विद्युत पुरवठा खंडित करू नये, ग्रामपंचायतींचा विद्युत पुरवठा खंडित करू नये, शेतातील मोटारपंप दुरुस्त करण्यात यावीत, शेतातील जळालेले रोहित्र नवीन देण्यात यावे आदी …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याबद्दल शिवसेनेने महावितरणविरोधात आंदोलन छेडले आहे. काल, 25 मार्चला सकाळी 11 वाजता महावितरण कंपनीला तोडफोडीचा इशारा देणारे निवेदन देण्यात आले.
शेतातील विद्युत पुरवठा खंडित करू नये, ग्रामपंचायतींचा विद्युत पुरवठा खंडित करू नये, शेतातील मोटारपंप दुरुस्त करण्यात यावीत, शेतातील जळालेले रोहित्र नवीन देण्यात यावे आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर शिवसेनेतर्फे आपल्या कार्यालयांची केव्हाही न सांगता तोडफोड करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. या वेळी जिल्हा उपप्रमुख वसंतराव भोजने, लालाभाऊ इंगळे, संदीप पाटील, रवींद्र भोजने, ईश्वर पांडे, गणेश ताठे, संतोष लाहुडकर, संजय गुजर, संतोष दिघे, महादेव चिमकर, अर्जुन तांगडे, अक्षय सुलताने, ऋषी जुमळे, अनिल देशमुख, दीपक जुमळे, अभिराजे हिवराळे, सोनू चोपडे, सागर वावटीकर, जगदीश चोपडे, रामा तांदुळकर, ललित राठी, गोपाळ अंबुस्कार, कैलास भोलवणकर, पुरुषोत्तम सोनवणे, अमोल जैन, जितू गोहर, सौरभ पाटील, शुभम लाहुडकर, सुनील तांगडे, त्र्यंबक घानोकर, मनोज जवरे, प्रकाश झांबरे, अरुण बाठे, भागवत रायपुरे, शशिकांत गव्हाळ, अशोक जुनगडे, सागर जुमळे,रवींद्र ठाकरे आदी शिवसैनिक हजर होते.