नांदुऱ्यात आरोग्‍य कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः नांदुरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे यांना आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट लवकर का देत नाही असे म्हणून एकाने अर्वाच्च भाषेत शिविगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिली होती. 22 मे रोजी नोडल अधिकारी म्हणून सेवा देत असलेले डॉ. चेतन बेंडे यांनाही एकाने मारहाण व शिविगाळ केली. या घटनांच्या निषेधार्थ …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः नांदुरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे यांना आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट लवकर का देत नाही असे म्हणून एकाने अर्वाच्‍च भाषेत शिविगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिली होती. 22 मे रोजी नोडल अधिकारी म्हणून सेवा देत असलेले डॉ. चेतन बेंडे यांनाही एकाने मारहाण व शिविगाळ केली. या घटनांच्या निषेधार्थ तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज, 24 मे रोजी काळी फिती लावून काम केले.

या निंदनीय घटनांमुळे गेल्या दोन वर्षांमध्ये कोविड साथीच्या काळात दिवसरात्र प्रामाणिक सेवा देणाऱ्या सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी वर्गामध्ये भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, मनोबल खच्चीकरण झाले आहे. त्यामुळे 27 मे रोजी एक दिवस काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. दोषींवर कडक कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. अशा समाजविघातक घटनांना आळा न बसल्यास तालुक्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी बेमुदत सामूहिक रजेवर जातील, असा इशारा तहसीलदार राहुल तायडे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर डॉ. अभिलाष खंडारे, डॉ. चेतन बेंडे, डॉ. जैस्वाल, डॉ. सचिन पांडव, डॉ. मेहमूद खान, डॉ. वर्षा नारखेडे आदींच्‍या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रति आमदार राजेश एकडे, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदींना देण्यात आल्या आहेत, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे यांनी बुलडाणा लाईव्हशी बोलताना सांगितले.