नांदुर्यात त्या 18 निराधार महिलांच्या चेहर्यावर असे फुलले हास्य!
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 26 जानेवारी रोजी नांदुरा तहसील कार्यालयात 18 निराधार महिलांना प्रत्येकी 20,000 रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
निराधार महिलांच्या पाठिशी महाविकास आघाडी सरकार खंबीरपणे आहे, असे प्रतिपादन यावेळी आमदार राजेश एकडे यांनी केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ काँग्रेस नेते पदम पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस नीलेश पाऊलझगडे, नांदुरा काँग्रेस अध्यक्ष भगवान धांडे, शहर अध्यक्ष गौरव पाटील, युवक अध्यक्ष ज्ञानेश्वर डामरे, नांदुरा तहसीलदार राहुल तायडे, नगर परिषद मुख्याधिकारी आशिष बोबडे, नांदुरा पोलीस स्टेशन निरीक्षक श्री. नाईकनवरे, गटविकास अधिकारी समाधान वाघ, तालुका भूमिअभिलेख अधिकारी श्री. सैतवाल, नायब तहसीलदार संजय मार्कड यांच्यासह पात्र महिला लाभार्थी उपस्थित होत्या.