नांदुरा तालुक्यातील आणखी दोन ग्रामपंचायती बिनविरोध, 773 उमेदवार आजमावणार भाग्य!

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, 31 डिसेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी होऊन एकूण 1145 अर्ज शिल्लक होते. आज, 4 जानेवारीला अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत असल्याने 291 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. 81 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. माघार घेतलेल्या नंतर शिल्लक राहिलेल्या अर्जांची संख्या 773 असून ते …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, 31 डिसेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी होऊन एकूण 1145 अर्ज शिल्लक होते. आज, 4 जानेवारीला अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत असल्याने 291 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. 81 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. माघार घेतलेल्या नंतर शिल्लक राहिलेल्या अर्जांची संख्या 773 असून ते आपले भाग्य आजमावणार आहेत. तसेच उमेदवारांना निवडणूक चिन्हांचेही (निशाणी) वाटप करण्यात आले आहे. यापूर्वी शेबा खुर्द ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. आजही वसाळी खुर्द व पिंपळखुटा खुर्द या ग्रामपंचायत बिनविरोध झालेल्या आहेत, असे निवडणूक अधिकारी व नायब तहसीलदार संजय मार्कड यांनी कळविले.