नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा मराठा पाटील युवक समितीतर्फे सत्कार
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मराठा पाटील युवक समितीतर्फे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा 12 मार्चला करण्यात आला.
बेलाड खरकुंडी (ता.नांदुरा) येथील सरपंच सौ. वैशाली सुधाकर साबे, शेगाव तालुक्यातील पाडसूळ येथील सरपंच योगेश पिसे, टाकळी विरोचे सरपंच नंदलाल उन्हाळे, तरोडा डीचे सरपंच प्रवीण कडाळे, गौलखेड उपसरपंच ज्ञानेश्वर शेजोळे, कणारखेडच्या ग्रामपंचायत समिती सदस्या कमलाबाई निळे, टाकळी विरोचे सदस्य प्रवीण उन्हाळे, ओंकारराव उन्हाळे,अमोल उन्हाळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा पाटील युवक समितीचे संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे, अनिल मेतकर, रवींद्र बाणाईत, जिल्हा सचिव प्रा. डॉ. योगेश म्हैसागर, शेगाव तालुकाध्यक्ष रवींद्र ढोले, शेगाव शहराध्यक्ष श्याम अढाव, ज्ञानेश्वर ताकोते, दत्ता वडतकर, ज्ञानेश्वर शेजोळे, अविनाश शेजोळे, ऋषभ शेजोळे, धनंजय शेजोळे, ऋषकेश उन्हाळे, विठ्ठल उन्हाळे, वैभव टिकार, ऋषिकेश भा.उन्हाळे, आकाश उन्हाळे, गजानन ठाकरे, अभिजित उन्हाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.