धक्कादायक… गेम खेळू न दिल्याने मोबाइल फोडला; नंतर विहिरीत उडी घेतली!; १६ वर्षीय मुलाचा करुण अंत!!, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव येथील १६ वर्षीय राहुल संदीप राऊत (रा. चांदमारी, खामगाव) या मुलाचा मृतदेह २८ सप्टेंबर रोजी हंसराजनगर भागात आढळला होता. २७ सप्टेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. राहुलने रागाच्या भरात आत्महत्या केल्याचे आता पोलीस तपासात समोर आले आहे. राहुलचा मावसभाऊ अनिल तराळे याने पोलिसांना सांगितले …
 
धक्कादायक… गेम खेळू न दिल्याने मोबाइल फोडला; नंतर विहिरीत उडी घेतली!; १६ वर्षीय मुलाचा करुण अंत!!, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव येथील १६ वर्षीय राहुल संदीप राऊत (रा. चांदमारी, खामगाव) या मुलाचा मृतदेह २८ सप्टेंबर रोजी हंसराजनगर भागात आढळला होता. २७ सप्टेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. राहुलने रागाच्या भरात आत्महत्या केल्याचे आता पोलीस तपासात समोर आले आहे.

राहुलचा मावसभाऊ अनिल तराळे याने पोलिसांना सांगितले की, राहुलला मोबाइलवर गेम खेळण्याचा नाद होता. २७ सप्टेंबर रोजी तो गेम खेळत असताना मोबाइलवर गेम खेळू नको असे घरच्यांनी म्हटले. यामुळे राहुलला राग आला. रागारागात त्याने हातातील मोबाइल जोरात जमिनीवर आदळून फोडून टाकला. नंतर तो घरातून निघून गेला. रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. २८ सप्टेंबर रोजी सकाळी हंसराजनगर भागातील एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळला.