‘तुझी बायको माहेरावरून कधी येते?’विचारणे पडले महागात!; शेगावमध्ये वाचा काय घडलं…

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नको त्या चौकश्या करणं कसं महागात पडू शकतं, याचं उदाहरण शेगावमध्ये समोर आलं आहे. “तुझी बायको माहेरावरून कधी येते?’ असे मित्राला विचारल्याने मित्राने लाकडी दंडूक्याने बेदम चोप दिला. ही घटना शेगाव शहरातील मिलिंदनगरच्या तीन पुतळे परिसरात १८ ऑक्टोबरच्या रात्री दहाला घडली. प्रकाश साहेबराव शेगोकार (रा. मिलिंदनगर, शेगाव) याने या प्रकरणात …
 
‘तुझी बायको माहेरावरून कधी येते?’विचारणे पडले महागात!; शेगावमध्ये वाचा काय घडलं…

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नको त्‍या चौकश्या करणं कसं महागात पडू शकतं, याचं उदाहरण शेगावमध्ये समोर आलं आहे. “तुझी बायको माहेरावरून कधी येते?’ असे मित्राला विचारल्याने मित्राने लाकडी दंडूक्‍याने बेदम चोप दिला. ही घटना शेगाव शहरातील मिलिंदनगरच्‍या तीन पुतळे परिसरात १८ ऑक्‍टोबरच्‍या रात्री दहाला घडली.

प्रकाश साहेबराव शेगोकार (रा. मिलिंदनगर, शेगाव) याने या प्रकरणात तक्रार दिली. गजानन पुरणाजी गाडेराव (रा. मिलिंदनगर, शेगाव) असे मारहाण करणाऱ्याचे नाव आहे. हे दोघे मित्र असून, शेजारी शेजारी राहतात. दोघांनी सोबत दारू पिली व घराकडे येत होते. प्रकाशने रस्‍त्‍यात गजाननला विचारले की तुझी बायको माहेरवरून कधी येते? त्‍यामुळे गजानन संतापला. “तुला माझ्या बायकोची काय घेणेदेणे आहे?’ असे म्हणून त्याने प्रकाशला शिविगाळ करत अंगणात पडलेल्या लाकडी दांड्याने डोक्यावर मारहाण केली. तपास पोहेकाँ संतोष गवई करत आहेत.