तहसीलदार तेजश्री कोरे म्‍हणाल्या, लस सुरक्षितच, भीती कशाला हवी?

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते)ः भारताने काढलेल्या आजपर्यंतच्या सर्वच लसी यशस्वी ठरल्या असून, कोरोनावर मात करण्यासाठी देण्यात आलेली लसही सुरक्षित आहे. महसूल विभागासह सर्व विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भीती न बाळगता कोरोना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी परिक्षाधीन तथा तहसीलदार तेजश्री कोरे यांनी केले. तालुका वैद्यकीय रुग्णालयात शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण केले जात आहेत. पहिला टप्प्यात तेजश्री कोरे …
 

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते)ः भारताने काढलेल्या आजपर्यंतच्‍या सर्वच लसी यशस्वी ठरल्या असून, कोरोनावर मात करण्यासाठी देण्यात आलेली लसही सुरक्षित आहे. महसूल विभागासह सर्व विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भीती न बाळगता कोरोना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी परिक्षाधीन तथा तहसीलदार तेजश्री कोरे यांनी केले.

तालुका वैद्यकीय रुग्णालयात शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण केले जात आहेत. पहिला टप्‍प्‍यात तेजश्री कोरे यांनी लस घेतली. एकूण ६०० जणांना लस देण्यात आल्याची व पदनिहाय नावासह नोंद आरोग्य विभागाकडे आहे. उर्वरित सर्वच विभागांच्‍या कर्मचाऱ्यांना दोन ते तीन दिवसांत कोरोना लस देण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रोजतकार यांनी दिली.