…तर फोटो नाही म्‍हणून जळगाव जामोदचे ‘ते’ राहणार नाहीत ‘मतदार!’

जळगाव जामोद (सय्यद अली मुर्तजा) ः जळगाव जामोद तालुक्यातील मतदारयाद्यांत अनेक मतदारांचे फोटोच नाहीत. बीएलओ त्यांना फोटो मागून थकले. पण अद्याप अनेक मतदारांनी फोटोच दिले नाहीत. त्यामुळे मतदारांनी तातडीने त्यांचे फोटो 15 मार्चपर्यंत बीएलओंकडे द्यावेत अन्यथा त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात येतील, अशी माहिती तहसीलदारांनी दिली आहे. ग्रामपंचायत, नगरपरिषद व इतर ठिकाणी मतदारयाद्या 15 जानेवारीलाच लावल्या …
 

जळगाव जामोद (सय्यद अली मुर्तजा) ः जळगाव जामोद तालुक्‍यातील मतदारयाद्यांत अनेक मतदारांचे फोटोच नाहीत. बीएलओ त्‍यांना फोटो मागून थकले. पण अद्याप अनेक मतदारांनी फोटोच दिले नाहीत. त्‍यामुळे मतदारांनी तातडीने त्‍यांचे फोटो 15 मार्चपर्यंत बीएलओंकडे द्यावेत अन्यथा त्‍यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात येतील, अशी माहिती तहसीलदारांनी दिली आहे. ग्रामपंचायत, नगरपरिषद व इतर ठिकाणी मतदारयाद्या 15 जानेवारीलाच लावल्या असून, वारंवार कळवूनही फोटो सादर करण्यास मतदारांकडूनच विलंब होत असल्याचे तहसीलदारांनी म्‍हटले आहे.