जिल्हास्तरीय युवा संसदेत जिल्ह्यातून सलोनी त्रिवेदी, अभिजित खोडकेचे यश

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावे यासाठी केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्रातर्फे जिल्हास्तरीय युवा संसद 28 डिसेंबरला घेण्यात आली. यात बुलडाणा विभागातून सलोनी त्रिवेदी आणि अभिजित खोडके यांनी बाजी मारली.जिल्हास्तर युवा संसदेत प्रत्येकाला आपले मत मांडण्यासाठी 4 मिनिटे वेळ देण्यात आला होता. स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्यातील 22 स्पर्धकांनी …
 

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावे यासाठी केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्रातर्फे जिल्हास्तरीय युवा संसद 28 डिसेंबरला घेण्यात आली. यात बुलडाणा विभागातून सलोनी त्रिवेदी आणि अभिजित खोडके यांनी बाजी मारली.जिल्हास्तर युवा संसदेत प्रत्येकाला आपले मत मांडण्यासाठी 4 मिनिटे वेळ देण्यात आला होता. स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्यातील 22 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. पंकजकुमार नन्नवरे, डॉ. राधेश्याम चौधरी, कॅप्टन मोहन कुलकर्णी, डॉ. दिनेश पाटील, विनोद ढगे, दीपक सपकाळे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समन्वयक जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर होते. आभार कार्यक्रम अधिकारी अजिंक्य गवळी यांनी मानले. कार्यक्रमासाठी चेतन वाणी, आकाश धनगर, शाहरुख पिंजारी, रोहन अवचारे यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेतून जळगाव जिल्ह्यातून हर्षल प्रवीण पाटील व गिरीष घनश्याम पाटील आणि बुलडाणा जिल्ह्यातून अभिजीत अनिल खोडके व सलोनी संजय त्रिवेदी यांची निवड करण्यात आली असून ते राज्यस्तरीय स्पर्धेत ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार आहेत.

राष्ट्रीयस्तरावर लाखोंची बक्षीसे मिळणार

राज्यस्तरीय युवा संसदमधून 3 विद्यार्थी देशस्तरावर सहभागी होण्यासाठी निवडले जातील. राज्यस्तरीय स्पर्धा 1 ते 5 जानेवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने होत आहे. राष्ट्रीय युवा संसद 12 आणि 13 जानेवारी रोजी संसद भवनाच्या मुख्य सभागृहात होणार आहे. सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांना जेवण, प्रवास भत्ता दिला जाणार असून विजेत्यांना प्रथम बक्षीस 2 लाख, द्वितीय 1.5 लाख, तृतीय बक्षीस 1 लाख असणार आहे.