जिगाव प्रकल्पाचे “राष्ट्रमाता जिजाऊ सागर’ नामकरण करा; “या’ संघटनेने केली मागणी
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सरकारचा महत्वाकांक्षी व शेतकरी हिताचा प्रकल्प म्हणून जिगाव प्रकल्पाकडे पाहिले जाते. अमरावती विभागातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून हा प्रकल्प समोर येत आहे. या प्रकल्पाला माँ जिजाऊंचे नाव द्यावे. “राष्ट्रमाता जिजाऊ सागर’ असे प्रकल्पाचे नामकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, समविचारी संघटनांनी एकत्र येऊन केली आहे. राष्ट्रमाता जिजाऊ सेवा प्रतिष्ठान स्थापन …
Aug 23, 2021, 21:30 IST
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सरकारचा महत्वाकांक्षी व शेतकरी हिताचा प्रकल्प म्हणून जिगाव प्रकल्पाकडे पाहिले जाते. अमरावती विभागातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून हा प्रकल्प समोर येत आहे. या प्रकल्पाला माँ जिजाऊंचे नाव द्यावे. “राष्ट्रमाता जिजाऊ सागर’ असे प्रकल्पाचे नामकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, समविचारी संघटनांनी एकत्र येऊन केली आहे. राष्ट्रमाता जिजाऊ सेवा प्रतिष्ठान स्थापन करून ही मागणी शासनदरबारी रेटली जाणार अाहे. परिसरातील बुडीत व लाभीत ग्रामपंचायतींचे ठराव घेऊन प्रतिष्ठानतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन नुकतेच देण्यात आले.