खामगाव बाजार समितीच्‍या सचिव भिसेंवर लाखोंच्‍या घोटाळ्याचा ठपका; पद काढून घेतले, जिल्हा उपनिबंधकांची कारवाई

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मुकुटराव भिसे यांनी बाजार समितीत लाखो रुपयांचा घोटाळा केला. कोरोना काळात भोजन वाटप व सुरक्षा रक्षक नेमणुकीत हा घोटाळा भिसे यांनी केल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे भिसे यांचे सचिवपदाचे अधिकार काढून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहे आहेत. …
 
खामगाव बाजार समितीच्‍या सचिव भिसेंवर लाखोंच्‍या घोटाळ्याचा ठपका; पद काढून घेतले, जिल्हा उपनिबंधकांची कारवाई

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खामगाव कृषी उत्पन्‍न बाजार समितीचे सचिव मुकुटराव भिसे यांनी बाजार समितीत लाखो रुपयांचा घोटाळा केला. कोरोना काळात भोजन वाटप व सुरक्षा रक्षक नेमणुकीत हा घोटाळा भिसे यांनी केल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे भिसे यांचे सचिवपदाचे अधिकार काढून त्यांच्‍याविरुद्ध कायदेशीर कारवाईचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहे आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक श्रीकृष्ण टिकार यांनी भिसे यांची चौकशी करण्याची मागणी केली होती.

याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने भिसे यांच्या गैरव्यवहाराची चौकशी केली व चौकशी अहवाल 18 मार्च 2021 रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केला होता. समितीने केलेल्या चौकशीत भिसे यांनी गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. चौकशीत कर्तव्यात कसूर करून निष्काळजीपणा केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने त्‍यांचे सचिवपदाचे कार्यकारी अधिकार काढण्यात आले. लाखो रुपयांच्या गैरव्यवहाराची वसुली व पुढील कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

जिल्हा उपनिबंधकांनी 25 जून रोजी काढलेल्या आदेशाप्रमाणे खामगाव बाजार समितीचे सहाय्यक सचिव मुकुटराव भिसे यांनी केलेला गैरव्यवहार व आर्थिक नुकसान याबाबत चौकशी अहवालात सत्यता आढळलेली आहे. ज्यामध्ये कोरोना काळात भोजन वाटप पाकिटे व सुरक्षा रक्षक नेमणुकीत लाखो रुपयांचा गैरव्यवहार, कारवाई बुकात कोरे पेजेस सोडून हिशोब पट्टी व बिलात ताळमेळ न ठेवल्याने बाजार समिती व शासनाचे आर्थिक नुकसान आदींचा उल्लेख केला आहे. याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समिती खामगावचे प्रशासक दीपक जाधव यांना पत्र पाठवून भिसे यांचे गैरकारभाराबाबत झालेल्या चौकशी अहवालावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत.