खामगावात 7 फेब्रुवारीला ओबीसींचा भव्य मेळावा
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे 7 फेब्रुवारीला खामगाव येथे ओबीसी बांधवांचा विदर्भस्तरीय मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी 7 जानेवारीला शहरातील एएनएस इन्फो व्हॅलीत बैठक पार पडली. यावेळी ओबीसी बांधवांनी मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभियंता रमेशचंद घोलप यांनी केले आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. अनिल अंमलकार होते. नेते विजय भालतिडक, जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. प्रमोद डाबरे, प्रसिद्धीप्रमुख धनंजय महाले, अनिल मुलांडे, अण्णासाहेब राठोड, रत्नाताई डिक्कर, सुवर्णा वडोदे, मनोज भोपळे, सुरज बेलोकार, जयश्री वांढे, रामविकास कुकडे, अमोल व्यवहार, नसीम शाह नासीर शाह, नितीन देठे, प्रा. गोपालकृष्ण राखोंडे आदींची उपस्थिती होती. मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
पदाधिकार्यांची निवड
यावेळी महासंघाच्या खामगाव शहर उपाध्यक्षपदी प्रकाश बावस्कार, शहर सचिवपदी सुभाष इटनारे, संघटकपदी चक्रधर बेलोकार, पवनराजे डिक्कर, पिंप्री गवळी ग्राम शाखाध्यक्षपदी रमेश भगत यांची नियुक्ती करण्यात आली.