खामगावमध्ये यंदाही होणार नाही मोठ्या देवीचा उत्‍सव!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोजागिरी पौर्णिमेला सुरू होऊन दहा दिवस मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरा हाेणारा जलालपुरा भागातील मोठ्या देवीचा उत्सव यंदा होणार नाही. कोरोनाविषयक नियमांमुळे हा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मोठी देवी मंडळाने घेतला आहे. १९ ऑक्टोबरला हा उत्सव सुरू होणार होता. राज्यभरातून या उत्सवासाठी भाविक खामगावला येत असतात. …
 
खामगावमध्ये यंदाही होणार नाही मोठ्या देवीचा उत्‍सव!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोजागिरी पौर्णिमेला सुरू होऊन दहा दिवस मोठ्या उत्‍साहात, जल्लोषात साजरा हाेणारा जलालपुरा भागातील मोठ्या देवीचा उत्‍सव यंदा होणार नाही. कोरोनाविषयक नियमांमुळे हा उत्‍सव साजरा न करण्याचा निर्णय श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मोठी देवी मंडळाने घेतला आहे.

१९ ऑक्‍टोबरला हा उत्‍सव सुरू होणार होता. राज्‍यभरातून या उत्‍सवासाठी भाविक खामगावला येत असतात. शेकडो वर्षांची परंपरा या उत्‍सवाला आहे. मागीलवर्षीही कोरोनामुळे उत्‍सव साजरा झाला नव्‍हता. खामगाव शहरात कोठेही कोणत्याही नावाने कोणत्याही पदाधिकाऱ्यांव्दारे जगदंबा मातेचा शांती उत्सव साजरा केला जाणार नाही. त्‍यामुळे कोणत्याही स्वरुपात वर्गणी, देणगी व दान गोळा करण्यात येणार नाही. याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष उत्तमराव उमरकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.