खामगावमध्ये यंदाही नाही शोभायात्रा अन्‌ रावण दहन!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव शहरातील दसरा उत्सवाला विशेष महत्त्व असते. येथील बालाजी संस्थानतर्फे दरवर्षी शहरातील रावणटेकडी येथे दसरा उत्सव आयोजित केला जातो. शहरातून शोभायात्रा काढण्यात येते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठ्या उत्सवांना परवानगी नाकारलेली आहे. त्यामुळे बालाजी संस्थानचा दसरा उत्सवही यंदा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थानचे …
 
खामगावमध्ये यंदाही नाही शोभायात्रा अन्‌ रावण दहन!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव शहरातील दसरा उत्‍सवाला विशेष महत्त्व असते. येथील बालाजी संस्‍थानतर्फे दरवर्षी शहरातील रावणटेकडी येथे दसरा उत्‍सव आयोजित केला जातो. शहरातून शोभायात्रा काढण्यात येते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्‍य सरकारने मोठ्या उत्‍सवांना परवानगी नाकारलेली आहे. त्‍यामुळे बालाजी संस्‍थानचा दसरा उत्‍सवही यंदा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती संस्‍थानचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी दिली.

दसरा उत्‍सवातील शोभायात्रेचे आकर्षण अवघ्या जिल्हावासियांना असते. शोभायात्रा पाहण्यासाठी जिल्हाभरातून लोक जमा होत असतात. रावण टेकडीवर शोभायात्रा गेली की रावणाच्‍या प्रतिकात्‍मक पुतळ्याचे दहन करण्यात येते. मात्र यंदा दहनही केले जाणार नाही. त्‍यामुळे भाविक, नागरिकांनी रावण टेकडीवर गर्दी करू नये, असे आवाहन बालाजी संस्‍थानने केले आहे.