खामगावमध्ये उद्या जिल्हास्तरीय महालीग कबड्डी स्पर्धा
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विदर्भ महालीग कबड्डी स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ ३० सप्टेंबरला सकाळी ९ वाजता निवडला जाणार आहे. ही निवड स्पर्धा खामगाव येथील नांदुरा रोडवरील संत शिरोमणी तुकाराम महाराज सभागृहात होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी जिल्हा कुस्तीगीर व कबड्डी संघाचे अध्यक्ष राणा गोकुलसिंह सानंदा राहतील. उपविभागीय अधिकारी …
Sep 29, 2021, 11:25 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विदर्भ महालीग कबड्डी स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ ३० सप्टेंबरला सकाळी ९ वाजता निवडला जाणार आहे. ही निवड स्पर्धा खामगाव येथील नांदुरा रोडवरील संत शिरोमणी तुकाराम महाराज सभागृहात होणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी जिल्हा कुस्तीगीर व कबड्डी संघाचे अध्यक्ष राणा गोकुलसिंह सानंदा राहतील. उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार अतुल पाटोळे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अधिक माहितीसाठी महावीर थानवी (मो. ९४२२४५०१९७) यांच्याशी संपर्क साधावा.