आमदार एकडे यांना मुंबईत राज्‍यपालांनी गौरवले!

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर-नांदुरा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांना २१ ऑगस्टला मुंबई येथे महाराष्ट्र जन गौरव पुरस्काराने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गौरवले. सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राज्यातील निवडक अशा ३८ व्यक्तींना सामाजिक सेवा प्रदान केल्याबद्दल राजभवनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. “मला मिळालेला पुरस्कार मतदारसंघातील सर्व कोविड योद्ध्यांना समर्पित करतो. कुठलाही गाजावाजा …
 
आमदार एकडे यांना मुंबईत राज्‍यपालांनी गौरवले!

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर-नांदुरा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांना २१ ऑगस्टला मुंबई येथे महाराष्ट्र जन गौरव पुरस्काराने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गौरवले. सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राज्यातील निवडक अशा ३८ व्यक्तींना सामाजिक सेवा प्रदान केल्याबद्दल राजभवनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. “मला मिळालेला पुरस्कार मतदारसंघातील सर्व कोविड योद्ध्यांना समर्पित करतो. कुठलाही गाजावाजा न करता श्रद्धेने या कठीण काळात झोकून देऊन रुग्णसेवा करणारे सच्चे कार्यकर्ते हे माझे खरे बळ व प्रेरणास्थान आहे, अशी प्रतिक्रिया आ. एकडे यांनी पुरस्‍कार स्वीकारल्यानंतर दिली.