अ‍ॅड. प्रवीणदादा कडाळे यांचा न्या. जोशींच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून सत्कार

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव तालुक्यातील तरोडा डी येथील प्रसिद्ध वकील अॅड. प्रवीणदादा कडाळे यांचा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. अंबादास जोशी यांच्या हस्ते कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला. तरोडा या छोट्या गावातील श्री. कराळे हे उच्चविद्याविभूषित व्यक्तिमत्व आहे.कोरोना काळात अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी अकोला व तरोडा या गावांत राबवले. …
 

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव तालुक्यातील तरोडा डी येथील प्रसिद्ध वकील अ‍ॅड. प्रवीणदादा कडाळे यांचा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. अंबादास जोशी यांच्या हस्ते कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला. तरोडा या छोट्या गावातील श्री. कराळे हे उच्चविद्याविभूषित व्यक्तिमत्व आहे.
कोरोना काळात अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी अकोला व तरोडा या गावांत राबवले. गावाचा विकास कसा होईल, गावातील लोकांचे राहणीमान कशाप्रकारे उंचावेल याकरिता ते सतत झटत असतात. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तरोडा ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी उच्चशिक्षित उमेदवारांसहित संपूर्ण पॅनल निवडून आणले आहे. येत्या पाच वर्षांत गावचा संपूर्ण विकास करण्याचा मानस त्यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना व्यक्त केला. या कार्याची जिल्ह्यात प्रशंसा होत असून, मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला.