हरसोडा येथे विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नववर्षाच्या पहिल्या दिवशी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामात शौर्य गाजवलेल्या शूरवीरांच्या गौरवशाली इतिहासाला साक्षी ठेवत 1 जानेवारी रोजी हरसोडा (ता. मलकापूर) येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवचंद मोरे होते. तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथा …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नववर्षाच्या पहिल्या दिवशी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामात शौर्य गाजवलेल्या शूरवीरांच्या गौरवशाली इतिहासाला साक्षी ठेवत 1 जानेवारी रोजी हरसोडा (ता. मलकापूर) येथे विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवचंद मोरे होते. तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथा महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. पूज्य भन्ते संघपालजी यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले. तसेच भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त 500 शूरवीर योद्ध्यांना मानवंदना दिली. यावेळी निवृत्ती तायडे, अशोकभाऊ जाधव, सुभाष मोरे, वासुदेव मोरे, हरी मोरे, ए. के. मोरे, राजू मोरे, देविदास मोरे, भीमराज मोरे, प्रकाश मोरे, सचिन तायडे, मुकेश निकम, कैलास निकम, विनोद कोगळे, देवाभाऊ मोरे, नीलेश झनके, अनंत मोरे, पांडुरंग झनके, वसंता निकम, किरण कोगळे, सूरज मोरे, संजय मोरे, सचिन इंगळे, नीलेश मोरे, धम्मपाल तायडे, नीरज मोरे, अतुल इंगळे, सतीश मोरे, सागर तायडे, अश्‍विन धुंदाळे, जयपाल तायडे, आकाश निकम, भिमाभाऊ इंगळे व उपासक उपासिका उपस्थित होते. सूत्रसंचालन राहुल मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीमराज्य ग्रुप, बोधिसत्व ग्रुप, रमाई महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले.