“पाॅर्न फिल्म’निर्मितीतून राज कुंद्राच्या खात्यात दररोज लाखो रुपये!
मुंबई ः मुलींना चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवायचे, त्यांचे न्यूड सीन शूट करायचे आणि ओटीटी प्लॅटफाॅर्ससह अन्य ठिकाणी विकून त्यातून लाखो रुपये कमवायचे हा गोरज धंदा बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा करीत होता. पोलिस तपासात ही बाब समोर आली असून, त्याच्या बँक खात्याचे डिटेल्स उघड झाले आहेत. दररोज त्याच्या खात्यावर किमान पन्नास हजार ते दहा लाख रुपये जमा होत असल्याचं दिसतं.
पोलिस तपासात राज कुंद्रा आणि त्याच्या साथीदारांमधील व्हॉट्सअप चॅट हाती लागलं आहे. या चॅटमधून अनेक गाैप्यस्फोट झाले आहेत. राज कुंद्राच्या व्हाट्स ॲप चॅटमधून अश्लील सिनेमा आणि पॉर्नोग्राफी ॲप मधून तो किती पैसे कमवायचा, हे उघड झाले आहे. राज कुंद्रा आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी तयार केलेल्या व्हाॅटस् ॲप ग्रुपचं नाव ‘एच’ असं होतं. कुंद्रा या ग्रुपचा ॲडमिन होता. या ग्रुपवर कुंद्रा पॉर्न सिनेमा बनवणाऱ्या कंपनीचा चेअरमन प्रदीप बक्षीसोबत पैशाचे व्यवहार आणि कटेंटबद्दल चर्चा करायचा. या चॅटमधून राज कुंद्रा अश्लील सिनेमाच्या निर्मितीतून दिवसाला लाखो रुपये कमवत होता, हे स्पष्ट झालं. या चॅटनुसार राज कुंद्रा ‘हॉटशॉट’ या पॉर्नोग्राफी ॲपवरील लाईव्हमधून दररोज एक लाख ८५ हजार रुपयांची कमाई करीत होता. या अॅपवरील अश्लील व्हिडिओमधून त्याला दररोज तो ४ लाख ५३ हजार रुपये मिळत. ‘हॉटशॉट’ या पॉर्नोग्राफी ॲपचे २० लाखांहून अधिक सबस्क्रायबर होते. त्यावरून त्यातून ८ ते १० कोटींची उलाढाल होत असावी. कोट्यवधी रुपयांची कमाई करूनही राजने ८१ कलाकारांचे पैसे थकवले.