सेम टू सेम ऐश्वर्याच!
अभिनेत्री ऐश्वर्या राय अशी एकमेव असावी की जिच्या हमशक्ल आजवर अनेक जणी दिसून आल्या आहेत. स्नेहा उलालची चर्चा थांबत नाही तोच मानसी नाईकही ऐश्वर्या रायसारखीच दिसते, असे म्हटले जाऊ लागले. आता त्यापाठोपाठ सेम टू सेम ऐश्वर्यासारखीच एक नवीन मुलगी समोर आली आहे. ती भारतातील नाही, पण इन्स्टाग्रामवर तिने टाकलेल्या फोटोंमुळे ती भारतात प्रचंड व्हायरल झाली आणि एवढेच नाही तर तिची तुलना ऐश्वर्याशी करून अनेक बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. ही मुलगी आहे आमना इमरान. ती पाकिस्तानमधील रहिवासी असून, ब्लॉग चालवते.
आमनाच्या इन्स्टाग्राम खात्यावर असे अनेक फोटो आणि व्हिडीओ आहेत ज्यात ती ऐश्वर्याला कॉपी करताना आढळते. हे फोटो पाहून सारेच चकीत झाले आहेत. आमनाचे इन्स्टाग्रामवर दोन हजार फॉलोअर्स आहेत. स्नेहा उलाल, मानसी नाईकनंतर आता आमना समोर आल्याने ऐश्वर्याचा चेहरा जगात एकमेव नाही हेही समोर आले आहे, एवढे नक्की.