सुझानचा स्वभाव बदलेना, आणखी एका तरुणाच्या प्रेमात!
बॉलिवूडमध्ये नाते तुटणे आणि नवीन जुळणे काही नवीन नाही. फार कमी जोडपे आहेत, ज्यांनी आपले वैवाहिक नाते केवळ जपलेच नाही तर यशस्वीही केले. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने पत्नी सुझान खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. नंतरच्या काळात दोघांनी एकत्र येण्याचा प्रयत्नही केला. पण तो फारसा यशस्वी झाला नाही. लग्नाच्या १४ वर्षांनंतर दोघे विभक्त झाले होते. सुझानशी घटस्फोट झाल्यानंतर हृतिकचे नाव अनेक नायिकांशी जोडण्याचा प्रयत्न झाला, पण त्या सर्व अफवा ठरल्या. सुझानचेही नाव अर्जुन रामपालसोबत जोडले गेले होते. अगदीच दोघांचे अफेअर सुरू असल्याचेही समोर येत होते. पण नंतर तीही चर्चा विरली. आता सुझानचे नवे अफेअर समोर आले आहे. अभिनेता अली गोनीच्या भावासोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा असून, अर्सलन असे त्याचे नाव आहे. तोही अभिनेता असून, लवकरच एका वेबसिरिजमध्ये झळकणार आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून सुझान त्याला ओळखत असून, अनेकदा अर्सलनला सुझानच्या घरातून बाहेर पडताना बघितले गेले आहे. ते कसे भेटले याबाबत माहिती घेतली असता सांगण्यात आले की टीव्ही जगतातील कॉमन मित्रांमुळे सुझानशी अर्सलनशी ओळख झाली. आता दोघे एकमेकांसोबत बराच वेळ घालवतात. अर्सलन ‘मैं हीरो बोल रहा हूं’ या सीरिजमध्ये दिसणार आहे. यात तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे. २०१४ मध्ये सुझानचा घटस्फोट झाला होता. दोघांना रेहान आणि हृदान ही २ मुले आहेत. डिसेंबर २००० मध्ये हृतिक आणि सुझान यांनी बंगळुरुत एका छोटेखानी सोहळ्यात लगीनगाठ बांधली होती. २००६ मध्ये त्यांच्या रेहान आणि २००८ मध्ये हृदान या मुलाचा जन्म झाला. डिसेंबर २०१३ मध्ये त्यांनी घटस्फोटाचा अर्ज केला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०१४ मध्ये कोर्टाने दोघांना घटस्फोट मंजूर केला. हृतिक अजूनही दुसरं लग्न करण्यास तयार नाही. दुसरीकडे सुझान मात्र नवनवे बॉयफ्रेंड बनवून फिरत असल्याचे टीका होत आहे. अर्जुन रामपालसोबत असलेल्या संबंधांमुळे हृतिक आणि तिच्यात दुरावा निर्माण झाला होता. मधल्या काळात ती हृतिककडे परत येईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. कडक लॉकडाऊन काळात मुलांना एकटे वाटू नये म्हणून काही काळ दोघे एकत्रही राहत होते. पण सुझानचा स्वभाव बदललेला दिसत नाही.