सायनी गुप्ताला लग्नाची भीती वाटते, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ ही वेब सीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्री सायनी गुप्ता यात प्रमुख भूमिका साकारत असून, तिच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे. सायनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिची नवी ‘काली-पीली टेल्स’ ही वेब सीरिजही लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यात सहा वेगवेगळ्या कहाण्या पाहायला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रेम, नाते आणि जीवनातील गुंतागुंत यावर या वेबसिरिजमध्ये प्रकाश टाकण्यात आल्याने आणि या भूमिकांतून वावरल्याने आता मला लग्नाची भीती वाटते, अशी प्रतिक्रिया सायनीने दिली आहे.
सायनी ही जोडीदाराला फसवणाऱ्या महिलेची भूमिका साकारतेय. यातून ज्या समस्या भेडसावतात त्या साकारणे मला अत्यंत कठीण गेले आहे. वास्तव आयुष्यात हे वेदनादायक होऊ शकतं. फसवणे चांगली गोष्ट नाही. मला तर लग्न करण्याचीच इच्छा आता होत नाही. माझीही अशीच फसवणूक झाली तर, अशी भीती मला वाटते, असे सायनी म्हणाली. सिंगल झुमका, लव्ह इन तडोबा, लग्न २.०, फिश फ्राय और कॉफी, हरा भरा और लूज एंड्स असे वेगवेगळे भाग या वेबसिरिजमध्ये आहेत. तिच्यासोबत सोनी रझदान, गौहर खान, मानवी गग्रू, शरीब हाश्मी, विनय पाठक आदी कलाकारही आहेत. २० ऑगस्टपासून ही वेबसिरिज अॅमेझॉन मीनी टीव्हीवर दिसायला सुरुवात झाली आहे.