संजय दत्त अन् सलमानच्या मैत्रीत माधुरी दीक्षितमुळे फूट!
मुंबई : अभिनेता संजय दत्त आणि सलमान खान यांच्या मैत्रीचे किस्से प्रसिद्ध आहेत. एकेकाळी दोघे खूप जिवाभावाचे दोस्त होते. दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्रित कामही केले. विशेष म्हणजे हे सर्वच चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. मात्र दोघांच्या मैत्रीत फूट पडली होती आणि याला कारण ठरली ती माधुरी दीक्षित.
माधुरी दीक्षित आणि संजय दत्त एकेकाळी रिलेशनमध्ये होते. संजय दत्तच्या जीवनावर संजू हा चित्रपट येणार होता. या चित्रपटात आपल्या नावाचा उल्लेख होऊ नये असे माधुरीला वाटत होते. मात्र तिने स्वतः संजय दत्तला याबद्दल न सांगता सलमान खानला “तू संजयला सांग’ असे सांगितले होते. माधुरीला वाटले की सलमान त्याचा चांगला मित्र असल्याने तो त्याचे ऐकेल. मात्र संजयने त्याचे ऐकले नाही. त्यामुळे सलमानला राग आला. सलमानने त्याच्याशी बोलणं बंद केलं. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी संजय आणि सलमानमधील दुरी वाढतच गेली. अनेक दिवसांच्या दुराव्यानंतर ते आता पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा आहे.