शिक्कामोर्तब… विकी कौशल अन्‌ कॅटरिना कैफचं लफडं आलं समोर!!

बॉलीवूडमध्ये नाते जुळणे आणि तुटणे नवीन नाही. कॅटरिना कैफ तर अनेकांशी नात्यात राहिली आहे. सलमान खान, रणबीर कपूर आणि आता विकी कौशलसोबत तिचे नाते जुळल्याची चर्चा होती. मात्र या नात्याला दुजोरा मिळत नव्हता. अखेर आता शिक्कामोर्तब झालो आहे. अभिनेता हर्षवर्धन कपूरने दोघांच्या नात्याचा गौप्यस्फोट केला आहे. विकी कौशल कतरिनाच्या घरातून बाहेर पडताना अनेकदा बघितला गेलाय. …
 

बॉलीवूडमध्ये नाते जुळणे आणि तुटणे नवीन नाही. कॅटरिना कैफ तर अनेकांशी नात्‍यात राहिली आहे. सलमान खान, रणबीर कपूर आणि आता विकी कौशलसोबत तिचे नाते जुळल्‍याची चर्चा होती. मात्र या नात्‍याला दुजोरा मिळत नव्‍हता. अखेर आता शिक्कामोर्तब झालो आहे. अभिनेता हर्षवर्धन कपूरने दोघांच्‍या नात्‍याचा गौप्यस्‍फोट केला आहे.

विकी कौशल कतरिनाच्या घरातून बाहेर पडताना अनेकदा बघितला गेलाय. मात्र तरीही दोघे केवळ मित्र आहोत असे सांगत होते. मात्र अभिनेता हर्षवर्धन कपूरने सांगितले, की कॅटरिना आणि विकी दोघेही प्रेमात आहेत आणि हे खरं आहे. कॅटरिना आणि विकी यांच्या अफेअरची चर्चा 2018 पासून आहे. कॉफी विथ करण या शोमधून या नात्‍याला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येते. तिच्या बाजूला कोणता अभिनेता शोभेल ? असा प्रश्न करण जोहरने तिला विचारला होता. त्‍यावर उत्तर देसाना कॅटरिनाने विकीचं नाव घेतलं होतं. 2019 मध्ये एका पुरस्कार सोहळ्यात विकीने कॅटरिनाला प्रपोजही केलं होतं, तेही सलमान खानसमोर.