शर्लिन चोप्राचा आरोप ः राज जबरदस्ती किस करत होता, धक्का देऊन बाथरूममध्ये पळाले!; म्हणाला होता, शिल्पा शेट्टीसोबत त्याचं नातं ठीक नाही!
अश्लील फिल्म बनविण्याच्या आणि वितरणाच्या आरोपातून अटकेत असलेल्या राज कुंद्रावर आता आणखी एक गंभीर आरोप झाला आहे. अभिनेत्री आणि माॅडेल शर्लिन चोप्रा हिनं राजविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
शर्लिननं याबाबत पोलिसांपुढं जबाब दिल्यानं राजच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. राज २०१९ मध्ये अचानक तिच्या घरी आला. त्यानं तिच्यासोबत जबरदस्तीनं गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. राजनं तिला बळजबरीनं किस केलं. त्यामुळं आपण घाबरून गेलो होतो, असं शर्लिन म्हणाली. आता तिच्या पोलिसांसमोरच्या जबाबामुळे या प्रकरणाला वेगळ वळण मिळालं आहे.गेल्या तीन महिन्यापूर्वी तिनं लैंगिक शोषणाची फिर्याद दिली होती. शर्लिननं पोलिसांना दिलेल्या जबाबात २७ मार्च २०१९ रोजी घडलेल्या घटनेचा उल्लेख केला आहे. ती म्हणते, माझ्या बिझनेस मॅनेजरला राज कुंद्रानं फोन केला होता. राज एका बिझनेस मिटिंगनंतर माझ्या घरी आला.
आमच्यात टेक्स्ट मेसेजवर काही वाद झाला. राजनं तिला जबरदस्तीनं किस करायला सुरुवात केली. तिनं त्याला धक्का देऊन बाजूला करण्याचा प्रयत्न केला; मात्र तिचं त्यानं काहीच ऐकलं नाही. परंतु नंतर त्याच्या तावडीतून सुटका करून मी बाथरूममध्ये पळाले, असं तिनं सांगितलं. शर्लिननं आणखी काही गंभीर आरोप केले आहेत. पत्नी शिल्पा शेट्टीसोबत त्याचं नातं ठीक नाही, असं राज तिला म्हणाला. तो घरी असतो, तेव्हा त्रासलेला असतो, असंही त्यानं सांगितलं. चोप्रा म्हणाली, कोणत्याही विवाहित पुरुषाशी मला अफेअर करायचं नव्हतं. व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्य एकमेकांत मिसळू द्यायचं नव्हतं.