लोकांना जे आवडतं तेच मी दिलं : उर्फी

मुंबई ः लोकांना जे आवडतंय तेच मी देण्याचा प्रयत्न करतेय. यावर काही लोक मला ट्रोल करत असले तरी समर्थन करणाऱ्या चाहत्यांची संख्या अधिक आहे, असं अभिनेत्री उर्फी जावेदनं म्हटलं आहे. अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. बिग बॉस ओटीटीमधून बाहेर आल्यानंतर तिच्या हटके स्टाईलने अनेकांच लक्षं वेधून घेतलं आहे. ती कधी ब्रा …
 
लोकांना जे आवडतं तेच मी दिलं : उर्फी

मुंबई ः लोकांना जे आवडतंय तेच मी देण्याचा प्रयत्न करतेय. यावर काही लोक मला ट्रोल करत असले तरी समर्थन करणाऱ्या चाहत्यांची संख्या अधिक आहे, असं अभिनेत्री उर्फी जावेदनं म्हटलं आहे.

अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. बिग बॉस ओटीटीमधून बाहेर आल्यानंतर तिच्या हटके स्टाईलने अनेकांच लक्षं वेधून घेतलं आहे. ती कधी ब्रा फ्लॉन्ट करते तर कधी पॅन्टला बटनच लावत नाही. विमानतळावर संपूर्ण पाठ उघडी दिसणारा टॉप घातल्यानेही तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. मात्र एका वेबसाईटवर ती म्हणाली, की बोलताना लोक काय बोलतात याकडे मी लक्ष देत नाही. तिने नुकत्याच परिधान केलेल्या पाठ उघडी ठेवणाऱ्या ड्रेसमुळे तिने हिजाबचा अपमान केल्याची टीका कट्टरपंथीयांनी केली आहे.