राहुल मुंबईपासून दूर त्‍याच्‍या क्‍विनसोबत!

‘बिग बॉस’ १४ चा रनरअप राहिलेला गायक राहुल वैद्य आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा परमार यांची सध्या जोरदार चर्चा होत आहे. याला कारण आहे ते राहुलने शेअर केलेला एक फोटो. या फोटोत राहुल आणि दिशा एका हेलिकॉप्टरमध्ये बसल्याचं दिसून येत असून, “चलो ले चलें तुम्हे तारों के शहर में… मुंबईपासून काही दिवसांसाठी दूर माझ्या क्वीनसोबत” असं …
 

‘बिग बॉस’ १४ चा रनरअप राहिलेला गायक राहुल वैद्य आणि त्‍याची गर्लफ्रेंड दिशा परमार यांची सध्या जोरदार चर्चा होत आहे. याला कारण आहे ते राहुलने शेअर केलेला एक फोटो. या फोटोत राहुल आणि दिशा एका हेलिकॉप्टरमध्ये बसल्याचं दिसून येत असून, “चलो ले चलें तुम्हे तारों के शहर में… मुंबईपासून काही दिवसांसाठी दूर माझ्या क्वीनसोबत” असं कॅप्शन त्‍याने फोटोला दिलं आहे. चार महिने ‘बिग बॉस’च्या घरात राहिल्यानंतर राहुलने दिशासोबत वाढवलेले नाते लवकरच दोघांच्‍या लग्‍नात रूपांतरीत होणार असल्याची चर्चा आहे. शोमध्ये राहुल जिंकला नसला तरी त्‍याची फॅन फॉलोईंग भरपूर वाढली आहे.

‘बिग बॉस’ शोमध्ये असताना राहुलने दिशाबद्दल सांगितले होते. शोदरम्यान दिशानेही ‘बिग बॉस’च्या घरात हजेरी लावत राहुलला लग्नासाठी होकार दिला होता. मात्र हा बिग बॉसचा प्रसिद्धी फंडा होता की खरंच राहुल आणि दिशात तसं काही आहे, याबाबत चर्चा सुरू होती. अखेर आता ते सारं काही खरंच होतं, हे सिद्ध झालं आहे. ‘बिग बॉस’च्या शोनंतर राहुलनं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं होतं. यासाठी दोघांनी तयारी देखील सुरू केल्याचे सांगण्यात येते. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. अगदी 50 ते 60 पाहुण्यांना निमंत्रण आहे. त्याच्या गेस्ट लिस्टमध्ये पहिले नाव आहे बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानचं आहे हे विशेष.