रश्मिका बिग बींसोबत दिसणार, रग्गड मानधन घेतलं!
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाने आपल्या मानधनात वाढ केली आहे. विकास बहल यांचा डेडली हा चित्रपट साइन केला असून, यात ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. मात्र, या चित्रपटासाठी तिने चक्ककोटींच्या घरात मानधन घेतल्याचं वृत्त आहे. उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर रश्मिकाच्या चाहत्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. आजवर तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवली. पण ती आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिचा मिशन मजनू चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. सध्या डेडली या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, रश्मिकाने त्यासाठी 5- 6 कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे. तिच्या आधी हा चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफला ऑफर करण्यात आला होता. मात्र, तिने काही कारणांमुळे नकार कळवल्याने रश्मिकाला संधी मिळाली आहे. यानिमित्ताने तिला बिग बींसोबत काम करण्याची संधीही मिळाली आहे. डेडली चित्रपटात रश्मिका आणि बिग बींसोबत नीना गुप्तादेखील झळकणार आहे. चित्रपटाची निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट करणार आहे.