रकुलनं प्लास्टिक सर्जरी केलीय का?
मुंबई ः अभिनेत्री रकूल प्रित सिंह हिने प्लास्टिक सर्जरी केल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. याचं कारण ठरलंय ते तिचा बदललेला लूक. गाल आत गेलेले, नाकातही बराच बदल दिसून येत असल्याने तिचे चाहते कोड्यात पडले आहेत. रकूलला याबाबत अनेकांनी विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र ती काहीच सांगत नसल्याने याबद्दलचा संशय वाढला आहे.
आधी साऊथ इंडस्ट्री आणि नंतर बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या रकूलने आजवर मोजक्याच चित्रपटांत काम केले. मात्र या चित्रपटांतील तिच्या अभिनयाची विशेष चर्चा झाली आहे. तिच्या सौंदर्याचे तर अनेकजण अक्षरशः दिवाने आहेत. मात्र तिचा लूक सध्या एकाएकी बदलला आहे. त्यामुळे सर्वांनाच चिंता पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थात बदललेलं हे रूप अधिक चांगलं की वाईट याबद्दल सध्या तरी अंदाज काढणे कठीण आहे. मात्र तिचे नवं रूपही लोभसवाणं आहे, अशी चर्चा नेटकऱ्यांत सुरू आहे.
मात्र ती याबद्दल काहीच खुलासा करत नसल्याने काहींनी तिच्यावर टीकाही सुरू केली आहे. यावर चर्चा झडत असून, कुणी ही काेण आहे असे म्हणून तिची हेटाळणी करत आहेत तर काही जण हिने महागडी प्लास्टिक सर्जरी केल्याचे म्हणत आहेत. खरेखोटे रकूललाच माहीत पण जर प्लास्टिक सर्जरी केलीच असेल तर लपविण्यासारखे काय आहे, हे मात्र अनाकलनीय आहे. ड्रग्स प्रकरणात रकूलची चर्चा झाली होती. तेलगू चित्रपट क्षेत्रातील १० कलाकारांना नोटीस बजावलेल्यांमध्ये रकूलचा समावेश होता.