…म्‍हणून राखी सावंत जाणार नाही दिशा-राहुलच्‍या लग्नाला!

मुंबई ः लग्नाला न जाण्यामागे वेळ, काम, पैसा अशी अनेक कारण देता येतात; परंतु ‘बिग बॉस’ फेम गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांच्या लग्नाला न जाण्यामागं राखी सावंत हिने दिलेलं कारण ऐकून लग्न टाळण्यासाठी असंही कारण असू शकतं, हा नवा शोध लागला आहे.राहुल आणि दिशाच्या लग्नाला फारच कमी कालावधी राहिला आहे. दोघांच्या लग्नाच्या …
 

मुंबई ः लग्नाला न जाण्यामागे वेळ, काम, पैसा अशी अनेक कारण देता येतात; परंतु ‘बिग बॉस’ फेम गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांच्या लग्नाला न जाण्यामागं राखी सावंत हिने दिलेलं कारण ऐकून लग्न टाळण्यासाठी असंही कारण असू शकतं, हा नवा शोध लागला आहे.
राहुल आणि दिशाच्या लग्नाला फारच कमी कालावधी राहिला आहे. दोघांच्या लग्नाच्या विधीतील फोटोज आणि व्हिडिओंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा हा लग्नसोहळा पार पडणार आहे. त्याला बाॅलिवूडमधील कोण कोण हजर राहणार, याचं आैत्सुक्य आहे; परंतु हजर राहणाऱ्यांपेक्षा का हजर राहणार नाही, हे राखी सावंत हिनं दिलेले कारण जास्त लक्षात राहणार आहे. राखी सावंतनं या दोघांच्या लग्नाला न जाण्याचं ठरवलंय. याचं कारण तिने शेअर केलंय. राखी सावंतचं नव्यानं आलेलं गाणं “ड्रीम में एंट्री’ला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे. या गाण्याने १७ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. त्यानंतर तिने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तिने राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. “त्यांच्या लग्नात जाण्यासाठी हेअर, मेकअप आणि कपडे इतकं सारं कुठून आणणार? त्यामुळे लग्नात जाऊ शकणार नाही.’ हे तिचं उत्तर ऐकल्यानंतर गरीब राखी सावंतची अनेकांना दया आली! राहुल आणि दिशाच्या लग्नातले लाडू खायला लग्नानंतर जाणार आहे, असं ती म्हणाली.