म्हणून ईशाने बॉलीवूडला ठोकला होता राम राम!
२०११ नंतर अचानक बॉलीवूडमधून गायब झालेली ईशा देओल पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. चित्रपट नाही पण ती वेबसिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘रूद्र-दी एज ऑफ डार्कनेस’ असे या वेबसिरिज नाव असून, यात अजय देवगणही दिसणार आहे.
हेमा मालिनी आणि धर्मेंद्रची ईशा मुलगी आहे. तिने ‘कोई मेरे दिल से पुछे’ या चित्रपटातून कलाक्षेत्रात पदार्पण केले होते. तिचं लग्न २०११ मध्ये उद्योगपती भरत तख्तानीसोबत झालं होतं. त्यानंतर तिने संसाराकडे वेळ देत बॉलीवूड करिअरला ब्रेक दिला होता. पती, मुले आणि एकूणच कुटुंबावर तिचं प्रचंड प्रेम आहे. मुलं लहान होती, त्यामुळे त्यांना सोडून करिअरकडे लक्ष देणे शक्य नव्हते, असे इशाने नुकतेच सांगितले. सांसारिक जबाबदाऱ्या स्वीकारणे प्रत्येक महिलेने गरजेचे आहे.
त्यामुळे आपणही दहा वर्षे बॉलीवूडला राम राम ठोकला होता, असे तिने सांगितले. तिची नवी वेबसिरिज ब्रिटनमधील लूथरचा हिंदी रिमेक आहे. अजय देवगणसोबत कामाचा अनुभव इशाला आहे. काल, युवा, में ऐसा ही हँू या तीन चित्रपटांत तिने त्याच्यासोबत काम केले आहे. इशा निर्मिती क्षेत्रातही उतरली असून, पती भरत तख्तानीसोबत तिने प्रॉडक्शन हाऊस सुरू केले आहे. याद्वारे ती एक दुआ ही वेबसिरिज तयार करत आहे. यातही तीच मुख्य भूमिकेत असेल.