मौनी लगीन उरकून टाकणार!

अखेर मौनीचं ठरलं आहे. ती लवकरच लगीन उरकून टाकणार असून, प्रियकर सूरज नंबियारसोबत सातफेरे घेणार आहे. अभिनेत्री मंदिरा बेदीच्या घरी मौनी राय आणि सूरजच्या कुटुंबात लग्नाची बोलणी झाली. मंदिरा ही मौनीची जवळची फ्रेंड आहे. लग्न कधी होणार हे अद्याप स्पष्ट नसले तरी त्यादृष्टीने दोन्ही कुटुंबाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू …
 

अखेर मौनीचं ठरलं आहे. ती लवकरच लगीन उरकून टाकणार असून, प्रियकर सूरज नंबियारसोबत सातफेरे घेणार आहे. अभिनेत्री मंदिरा बेदीच्या घरी मौनी राय आणि सूरजच्या कुटुंबात लग्नाची बोलणी झाली. मंदिरा ही मौनीची जवळची फ्रेंड आहे. लग्न कधी होणार हे अद्याप स्पष्ट नसले तरी त्यादृष्टीने दोन्ही कुटुंबाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या मौनीने नंतर मालिकांत काम केले आहे. ‘देवो के देव महादेव’ या मालिकेत तिने पार्वतीची भूमिका साकारून सर्वांची मने जिंकली होती. तिने बॉलिवूडमध्येही काम केले असून, अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ सिनेमात ती दिसली होती. याशिवाय ‘केजीएफ’ या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनमध्येही तिने आयटम साँग केला होता. आता ती ब्रह्मास्त्र चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. लॉकडाऊनमध्ये जेव्हा मौनी बहिणीकडे दुबईला गेली होती. तेव्हा तिची ओळख सूरजसोबत झाली. सूरज तिथे बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहे. दोघांनी नव्या वर्षाचं सेलिब्रेशनदेखील दुबईत केलं होतं.