मुलीनं निवडलेला प्रियकर जॅकी श्रॉफ यांना पडेना पसंत!

प्रेम कुणावरही बसू शकतं. प्रेम शेवटपर्यंत टिकतंच असं नाही. बाॅलिवूडमधल्या अनेकांची प्रेमप्रकरणं झाली. ती गाजली आणि मोडलीसुद्धा. त्यामुळं बाॅलिवूडमधल्या अभिनेत्यांना मुलीनं निवडलेला प्रियकर योग्य आहे, की नाही, तो तिला आयुष्यभर साथ देईल, की नाही याची चिंता असते. सध्या जॅकी श्राॅफ या स्थितीतून जात आहे. चित्रपटसृष्टीतील व्यक्तींची मुलं या ना त्या कारणानं चर्चेत असतात. जॅकीची मुलगी …
 

प्रेम कुणावरही बसू शकतं. प्रेम शेवटपर्यंत टिकतंच असं नाही. बाॅलिवूडमधल्या अनेकांची प्रेमप्रकरणं झाली. ती गाजली आणि मोडलीसुद्धा. त्यामुळं बाॅलिवूडमधल्या अभिनेत्यांना मुलीनं निवडलेला प्रियकर योग्य आहे, की नाही, तो तिला आयुष्यभर साथ देईल, की नाही याची चिंता असते. सध्या जॅकी श्राॅफ या स्थितीतून जात आहे.

चित्रपटसृष्टीतील व्यक्तींची मुलं या ना त्या कारणानं चर्चेत असतात. जॅकीची मुलगी कृष्णाही सातत्यानं चर्चेत असते . या दोघा बाप- लेकींची एक मुलाखत एका वाहिनीनं घेतली. त्यात दोघांच्या परस्परांविषयीची काळजी, पिढीतला विचार करण्यातला फरक प्रकर्षानं पुढं आला. जॅकीनं कृष्णाच्या रिलेशनशिपसंबंधी उघडपणे सांगितलं. हे सांगताना मुलीसाठी वरसंशोधन किती अवघड आहे, हे ही त्यांनी कबूल केलं. याच मुलाखतीच्या वेळी कृष्णा यांनी आपण ज्या मुलांसोबत राहतो ती वडील जॅकी यांना कशी पसंत पडत नाहीत, हे आवर्जून सांगितलं.

खरं तर मी त्यांनी दोषी देत नाही. ते बरोबर आहेत, असं कृष्णा म्हणाली. जॅकी यांचंही त्यावर काही म्हणणं आहे. कृष्णा ज्याच्यावर प्रेम करते, त्यांचा मी आदर करतो; परंतु योग्य मुलगा शोधणं हे माझ्यासमोरचं आव्हान आहे, असं ते सांगतात. तिला ज्याच्याबरोबर आयुष्य घालवायचे आहे. आईवडील किती काळ बरोबर राहणार? त्यामुळं ज्याच्याबरोबर आयुष्य घालवायचं आहे, तो मुलगा शोधणं कठीण आहे, याची कायम कबुली जॅकी श्राॅफ देतात. कृष्णाच्य मते वडील प्रोटेक्टिव्ह आहेत.