मल्लिका शेरावतला म्हणायचे, तू ऑनस्क्रीन बोल्ड होऊ शकते तर ऑफस्क्रीन का नाही..?

मुंबई ः अभिनेत्री मल्लिका शेरावत नेहमीच चर्चेत राहते. तिच्या चर्चेत राहण्याचे कारण म्हणजे तिचा बोल्ड लुक. सोशल मीडियावर ती तिच्या बोल्ड अवतारातील फोटो अपलोड करते. त्यामुळे तिचे चाहतेही अक्षरश: घायाळ होतात. एकाच चित्रपटात तब्बल १७ किसिंग सिन देण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. ख्वाहीश या चित्रपटात तिने अतिशय बोल्ड भूमिका साकारली होती. अभिनेता इम्रान हाश्मी सोबत …
 
मल्लिका शेरावतला म्हणायचे, तू ऑनस्क्रीन बोल्ड होऊ शकते तर ऑफस्क्रीन का नाही..?

मुंबई ः अभिनेत्री मल्लिका शेरावत नेहमीच चर्चेत राहते. तिच्या चर्चेत राहण्याचे कारण म्हणजे तिचा बोल्ड लुक. सोशल मीडियावर ती तिच्या बोल्ड अवतारातील फोटो अपलोड करते. त्यामुळे तिचे चाहतेही अक्षरश: घायाळ होतात. एकाच चित्रपटात तब्बल १७ किसिंग सिन देण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. ख्वाहीश या चित्रपटात तिने अतिशय बोल्ड भूमिका साकारली होती.

अभिनेता इम्रान हाश्मी सोबत केलेला मर्डर चित्रपटसुद्धा गाजला होता. नुकतेच तिने अभिनेत्री ईशा गुप्ता सोबत नकाब या वेब सिरीजमध्ये इंटिमेंट सिन दिला. एका वेबसाईटला तिने नुकतीच मुलाखत दिली. त्या मुलाखतीत ती म्हणाली, की स्टार होणे सोपे नव्हते. अनेक चित्रपटांत मी बोल्ड सीन दिले. त्यामुळे अभिनेत्यांनी माझ्याबाबत एक वेगळेच मत बनविले होते. अनेक अभिनेते माझा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत होते.तुला ऑनस्क्रीन बोल्ड होता येते तर मग ऑफस्क्रीन का नाही? असा सवाल अभिनेते करत होते, असे मल्लिका म्हणाली.