मराठमोळी सई आता तमिळी मालिकेत

मुंबई : सई ताम्हणकर हिची ओळख बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री अशी आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत ती जशी सक्रिय आहे, तशी ती छोट्या पडद्यावरही परीक्षकाचं काम करते. वेब सीरीजमध्येही तिच्या नावाचा डंका आहे. सईच्या समांतर-२ दोन या वेब सीरीजला घवघवीय यश मिळालं. सई ताम्हणकरचा ‘मिमी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. आता ती ‘नेटफ्लिक्स’ या …
 

मुंबई : सई ताम्हणकर हिची ओळख बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री अशी आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत ती जशी सक्रिय आहे, तशी ती छोट्या पडद्यावरही परीक्षकाचं काम करते. वेब सीरीजमध्येही तिच्या नावाचा डंका आहे. सईच्या समांतर-२ दोन या वेब सीरीजला घवघवीय यश मिळालं.

सई ताम्हणकरचा ‘मिमी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. आता ती ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘नवरसा’ या तमिळी मालिकेत चमकणार आहे. ती काम करीत असलेल्या नवरसा या वेब सीरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये नऊ वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या कथा असून, त्यातील एका कथेत सईची भूमिका असणार आहे. तिची छोटीशी झलक पहायला मिळाली आहे. ज्येष्ठ चित्रपट निर्माते मणिरत्नम यांनी सिनेमा जगतात उत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती केली आहे. आता ते एका दमदार प्रोजेक्टसह ओटीटीवर आले आहेत. या वेब सीरीजमध्ये दक्षिणात्य ज्येष्ठ अभिनेते आणि अभिनेत्रींना काम देण्यात येणार आहे. नेटफ्लिक्सनं मणिरत्नम यांच्या नवरसा वेब सीरीजचा टीझर रिलीज केला आहे. त्यात सईसह अनेक नामांकित अभिनेते आणि अभिनेत्री आहेत.