बॉलिवूड हळूहळू कोरोनाच्या विळख्यात
मनोज वाजपेयी, तारा सुतारिया, आशिष विद्यार्थी पॉझिटिव्ह मुंबई : चित्रपट व मालिका क्षेत्रातील कलाकार एकापाठोपाठ एक कोरोनाच्या विळख्यात सापडत चालल्याने बॉलिवूडवर चिंतेचे सावट वाढले आहे. अभिनेता मनोज वाजपेयी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांची भूमिका असलेल्या ‘डिस्पॅचड‘ चित्रपटाच्या चित्रिकरणावर परिणाम झाला आहे. दुसरीकडे अभिनेता आशिष विद्यार्थी हेही कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यांनी स्वत: इंन्स्टाग्रामवर ही माहिती दिली …
Mar 14, 2021, 09:31 IST
मनोज वाजपेयी, तारा सुतारिया, आशिष विद्यार्थी पॉझिटिव्ह
मुंबई : चित्रपट व मालिका क्षेत्रातील कलाकार एकापाठोपाठ एक कोरोनाच्या विळख्यात सापडत चालल्याने बॉलिवूडवर चिंतेचे सावट वाढले आहे. अभिनेता मनोज वाजपेयी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांची भूमिका असलेल्या ‘डिस्पॅचड‘ चित्रपटाच्या चित्रिकरणावर परिणाम झाला आहे. दुसरीकडे अभिनेता आशिष विद्यार्थी हेही कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यांनी स्वत: इंन्स्टाग्रामवर ही माहिती दिली असून त्यांच्यावर दिल्ली येथे उपचार सुरू आहेत.
गलिबॉयफेम सिद्धांत चतुर्वेदी हाही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री तारा सुतारिया यांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.